महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. अलीकडील काळात बनावट वेबसाइट, फसवे मोबाईल अँप (APK) आणि खोट्या e-Challan पेमेंट लिंकद्वारे वाहनचालक व नागरिकांची आर्थिक आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळे व सेवांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे नेमका प्रकार?
प्रसिद्धीपत्रकानुसार (दिनांक 13 फेब्रुवारी 2026), काही फसवे लोक खालील पद्धतीने नागरिकांची फसवणूक करत आहेत:
- बनावट परिवहन विभागाच्या वेबसाइट तयार करणे
- “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा नावाचे अनधिकृत APK फाईल्स शेअर करणे
- SMS किंवा WhatsApp द्वारे खोट्या e-Challan किंवा DL निलंबनाचे संदेश पाठवणे
- वाहन दंड थकबाकी असल्याचे सांगून तातडीने पेमेंट करण्यास भाग पाडणे
या माध्यमातून नागरिकांचे OTP, बँकिंग माहिती व इतर गोपनीय माहिती चोरली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
कोणती अधिकृत संकेतस्थळे वापरावीत?
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की खालील अधिकृत “.gov.in” संकेतस्थळेच वापरावीत:
- वाहन नोंदणी सेवा (VAHAN)
👉 https://vahan.parivahan.gov.in - ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI)
👉 https://sarathi.parivahan.gov.in - परिवहन सेवा
👉 https://www.parivahan.gov.in - e-Challan पोर्टल
👉 https://echallan.parivahan.gov.in
⚠️ लक्षात ठेवा:
“.gov.in” शेवट असलेलीच अधिकृत वेबसाइट असते.
“.com”, “.online”, “.site”, “.in” अशा डोमेनवरील संकेतस्थळांवर विश्वास ठेवू नये.
फसवणूक करणाऱ्यांकडून खालीलप्रमाणे संदेश पाठवले जातात:
- “आपल्या वाहनाचा दंड बाकी आहे. त्वरित भरा अन्यथा कारवाई होईल.”
- “आपले DL (Driving License) सस्पेंड होणार आहे. तातडीने लिंकवर क्लिक करा.”
अशा प्रकारचे संदेश आल्यास कोणतीही लिंक उघडू नये. परिवहन विभाग किंवा RTO कार्यालय कधीही WhatsApp किंवा इतर मोबाईल अँपद्वारे थेट पेमेंट लिंक पाठवत नाही.
अनधिकृत APK डाउनलोड करू नका
“RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा नावांच्या अॅप्स डाउनलोड केल्यास:
- मोबाईलमधील वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते
- बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात
- OTP व आर्थिक तपशील हॅक होऊ शकतात
त्यामुळे कोणतेही अँपफक्त अधिकृत Google Play Store किंवा अधिकृत संकेतस्थळावरूनच डाउनलोड करावे.
नागरिकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन
✔️ फक्त अधिकृत “.gov.in” संकेतस्थळांचा वापर करा
✔️ SMS/WhatsApp द्वारे आलेल्या पेमेंट लिंकवर क्लिक करू नका
✔️ अनोळखी APK फाईल डाउनलोड करू नका
✔️ OTP कोणालाही शेअर करू नका
✔️ संशयास्पद संदेश मिळाल्यास तक्रार करा
महाराष्ट्र परिवहन विभागाने सर्व वाहनचालक व नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन सेवांचा वापर करताना अधिकृत संकेतस्थळे वापरणे अत्यंत आवश्यक आहे. थोडीशी खबरदारी घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.
नागरिकांनी योग्य माहिती मिळवण्यासाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.



